College Logo

|| विद्यावन्त , यशस्वन्त , लक्ष्मीवन्त जनं कुरु ||

Bahujan Samaj Shikshan Prasarak Mandal's

Arts, Commerce & Science College, Songir, Tal. & Dist. - Dhule, Maharashtra, Pin - 424309

Affiliated to K.B.C.N.M.U., Jalgaon | U.G.C. 2F & 12(B)

NAAC Re-accredited 'B' Grade | KBCNMU Awarded 'B' Grade in Academic Audit

सोनगीर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

सोनगीर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

‘Not Me But You’च्या भावनेतून समाजसेवेचा संदेश; स्वयंसेवकांना विधायक कार्याची प्रेरणा
सोनगीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना दिवस कार्यक्रम

सोनगीर (24/09/2026): बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनगीर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. खैरनार होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अमृतरावजी केशवरावजी कसार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संचालक भैय्यासाहेब संदीप कसार, उपप्राचार्य व प्रमुख वक्ते डॉ. एन. एस. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. आर. के. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. आर. पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. पी. नगराळे व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. डी. पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख वक्ते डॉ. एन. एस. सोनवणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास व उद्देश स्पष्ट करताना स्वयंशिस्त, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, एकात्मता आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडतो, असे सांगितले. ‘Not Me But You’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.

डॉ. आर. के. जाधव यांनी वैयक्तिक राष्ट्रभक्तीपेक्षा कृतीतून राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याची गरज व्यक्त केली. तर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. जी. खैरनार यांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य व रक्तदान जनजागृती यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. डी. आर. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. आर. पी. नगराळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.